परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यांदेखत तिच्या 22 वर्षीय तरुण मुलाचा मृत्यू (boy died) झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी मृत तरुणाच्या (boy died) आईचा आक्रोश पाहून गावकरीही सुन्न झाले आहेत.
काय घडले नेमके?
नवरात्रीचा सण असल्याने आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 22 वर्षीय मुलाचा पाय घसरून खड्ड्यात पडून मृत्यू (boy died) झाला. आईच्या डोळ्यांदेखतच हि घटना घडली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव या गावी हि दुर्दैवी घटना (boy died) घडली आहे. रवी प्रकाश काकडे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मोरेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील रवी प्रकाश काकडे हा तरुण नवरात्रोत्सव सुरू असल्याने आपल्या आईसोबत गावा शेजारून होणाऱ्या दुधना नदीपात्रामध्ये कपडे धुण्यासाठी गेला होता.
अशातच निम्नदुधना प्रकल्प 100 टक्के भरला असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सोडण्यात आला होता. त्यामुळे दूधना नदी दुथडी भरून वाहत होती. यादरम्यान,आईसोबत कपडे धूत असताना रवीचा अचानक तोल गेला व तो नदीतील खड्ड्यामध्ये जाऊन पडला (boy died). यानंतर कपडे धूत असलेल्या आईने मुलगा खड्ड्यात पडल्याचे पाहून आरडाओरड केला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी दुधना नदीपात्रात उतरून रवी याचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवी याला तपासून मृत घोषित केले. आपल्या घरातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!