वादळी वाऱ्याने 300 फूट उंचीची धुराडी झोपडपट्टीवर कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जैविक वैद्यकीय कचरा प्रकल्पाची सुमारे 300 फूट उंचीची (चिमणी) धुरांडी पाईप रात्री आलेल्या प्रचंड वादळामुळे प्रकल्पा लगतच्या झोपडपट्टीवर कोसळली. त्यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत चार- पाच कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे महसूल विभागाने तातडीने सूरू केले आहेत.

कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या सुचनेनुसार तलाटी संजय जंगम, सर्कल महेश पाटील यांनी रात्रीपासूनच नुकसानग्रस्त परिसरात पाहणी करत झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे सूरू केले आहेत. काल रात्री वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला.

बारा डबरे परिसरात असणार्‍या जैविक कचरा प्रकल्पची चिमणीही वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाली. ही चिमणी नजीकच्या विद्यूत वाहिनीसह झोपडपट्टीवर कोसळल्याने पाच झोपडपट्ट्यांचे नुकसान झाले. रात्रीची ही घटना घडल्याने झोपडपट्टी परिसरात एकच खळबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे व धुराडी पडल्याने सतिश सुभाना सकटे, हिराबाई बाळासो काळे, नारायण नामदेव काळे ,अनिल अरुण खिलारे व शंकर मोतीराम सावंत यांचे असे जवळपास अंदाजे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरानजीकच्या बर्गे वस्ती येथे मेघा संतोष शिंदे यांच्या घराचे संपूर्ण छत काल रात्री वादळी वाऱ्यामुळे उडून जाऊन नजीकच असणाऱ्या इलेक्ट्रिक पोल वर आदळले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. लोखंडी अँगल व पत्रे असणारा हा छत विद्युत तारांवर अडकला होता. यामुळे घराचे व विद्यूत पोलचे हजारोंचे नूकसान झाले आहे. कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वारुंजी येथील जॅकवेल परिसरात विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या वादळी वाऱ्याने पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे मंगळवारी सकाळी शहरातील पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment