धक्कादायक ! 5 वर्षांच्या चिमुरडीवर 40 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 40 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरकृत्य केले आहे. त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या आरोपी नराधमाला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण
हि घटना नंदुरबार शहरातल्या जुनी सिंधी कॉलनी परिसरात घडली आहे. आरोपीचे नाव अनिल आत्माराम गुरुबक्षाणी असे आहे. त्याचे या परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. यामुळे याच परिसरात राहणारी 5 वर्षीय चिमुरडी आरोपीच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी आली होती. जेव्हा हि मुलगी आरोपीच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने तिच्याबरोबर गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून तिथून पळत जाऊन घरी गेली. यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. हे ऐकून घरच्यांना धक्का बसला.

यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठून नराधम अनिल गुरुबक्षाणी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्याविरोधात आयपीसी 370 व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.यानंतर पीडितेची वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आली असून आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे करत आहेत.