पुणे । पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात घडली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
A 60-year old man died by suicide at a quarantine centre of Pune Municipal Corporation in Kondhwa yesterday. He and his son had tested positive for #COVID19. Cause yet to be ascertained: Pune Police #Maharashtra pic.twitter.com/GVT4E9FdSP
— ANI (@ANI) July 7, 2020
आत्महत्या केलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्याला पुणे महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार केंद्रात त्याच्यासोबत 3 रुग्ण होते. ते नास्ता करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. त्यावेळी वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, नास्ता करण्यासाठी गेलेले रुग्ण परतले त्यावेळी रुग्णाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”