जळगाव । लॉकडाऊनच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने दर ५८ हजारांच्या घरात पोहोचला होता. मात्र, सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किलोच्या दरातही अनपेक्षित मोठी घट झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये मंदीच्या काळात सराफा बाजारात तेजी असल्याचे दिसून आले आहे. सातत्याने सराफा बाजारात तेजीत वाढ होत असताना आज अचनाक घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याचांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत असून सोने भावात प्रतितोळे ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या भाव प्रतितोळे ५८ हजार वरुन घसरत ५३ हजार ५०० वर गेले आहेत तर चांदीच्या भावात प्रतिकिलो १४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे भाव ७८ हजार रुपये किलो वरुन झाली ६४ हजार रुपये किलोपर्यंत घाली आले आहेत.
आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात घसरण झाल्याने सोने आणि चांदी दरात मोठी घसरणा झाल्याची माहिती जळगावातील सोने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. परंतु आता सोन्याचांदीची विक्री सुरु झाल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड तूट झाली आहे. ही तूट पुढे देखील सुरु राहणार आहे, अशी माहिती सोने व्यापाऱ्यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”