नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील बहुचर्चित बुल्ली बाय अॅपचं कनेक्शन राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले आहे. या हा अॅप डेव्हलप करणारा मास्टर माइंड 21 वर्षीय नीरज विश्नोई नागौर येथील रोटू गावातील आहे. नीरज इंजीनियरिंगचा विद्यार्थी आहे. तो या अॅपच्या माध्यमातून महिलांची ऑनलाइन बोली लावत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आसाममधील जोरहाटमधून अटक केली आहे. नागौरच्या रोटू गावात राहणारा नीरज आपल्या जन्मानंतर कुटुंबासह आसामच्या जोरहाटमध्ये राहत होता. नुकताच तो नोव्हेंबर महिन्यात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये गेला होता.
यादरम्यान त्याने बुल्ली बाई अॅप तयार केला होता. या अॅपशी संबंधित ट्विटर हँडलदेखील नीरजने तयार केले होते. नीरज वेल्लोर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, भोपालमध्ये B.Tech विद्यार्थी होता. या प्रकरणाचा उलघडा झाल्यानंतर युनिवर्सिटी मॅनेजमेंटने नीरजला कॉलेजमधून सस्पेंड केले. नीरजने बुल्ली बाई नावाचा हा अॅप नोव्हेंबर 2021 मध्ये डेव्हलप केला होता. डिसेंबर 2021 मध्ये हा अॅप अपडेट करण्यात आला. 31 डिसेंबर रोजी या अॅपचा ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आला होता.
या अॅपबद्दल ट्वीट करण्यासाठी @Sage0x1 आणि काही अन्य ट्विटर अकाऊंटदेखील तयार करण्यात आले होते. हे अॅप डेव्हलप करण्यासाठी नीरजने स्पेशल ट्रेनिंगसुद्धा घेतली होती. नीरजच्या फोन आणि लॅपटॉपमधून याचे पुरावे मिळाले आहे. या पुराव्यांवरून नीरज या प्रकरणाचा मास्टरमांइड असल्याचे समोर आले आहे. या आरोपी नीराजच्या लॅपटॉपमधून अनेक महिलांचे सापडले आहेत. जे अॅपवर अपलोड करण्यात आले होते. या अॅपचे अनेक सोशल मीडिया अकाउंटदेखील तयार करण्यात आले होते. त्यावरून आरोपी नीरज हा या अॅपला प्रमोट करत होता.