मुंबई लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाते. चाकरमान्यांचे कामाचे वेळापत्रक हे लोकलवर अवलंबून असते. रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. मात्र आज दिनांक २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरला सुद्धा . लोकलच्या काही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
गोरेगाव आणि कांदिवली रेल्वे स्थानका दरम्यान सुरू असलेल्या विकास कामांमुळे हा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. यामुळे काही गाड्या या विलंबाने सुटणार आहे तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
कुठे आहे ब्लॉक ?
मिळालेल्या माहितीनुसार सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि अप फास्ट मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आलाय. आज म्हणजेच दिनांक 23 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता ते मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून 30 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे अशाप्रकारे साडेसहा तासांचा हा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. या काळात पाचव्या आणि अप जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
याबरोबरच गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांत दरम्यान सुरू असलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून वेस्टर्न रेल्वे तर्फे हा ब्लॉक घेण्यात आला. त्यानुसार सर्व फास्ट मार्गावरील गाड्या आज रात्री अकरा वाजल्यापासून ते पहाटे 03:30 पर्यंत बोरिवली आणि अंधेरी दरम्यान अप स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे उपनगरीय सेवांमध्ये व्यत्यय येणार आहे. तर ब्लॉक दरम्यान अनेक उपनगरीय गाड्यांवर परिणाम होत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासांना असुविधाला सामोरे जावे लागणार आहे.
23 सप्टेंबर 2024 रोजी ब्लॉक
ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 23 सप्टेंबर 2024 रोजी चर्चगेट हून रात्री दहा वाजून 24 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट बोरिवली लोकल मालाड पर्यंत धावणार आहे. तर मालाड आणि बोरिवली दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर याच दिवशी विरार हुन रात्री दहा वाजून 44 मिनिटांनी सुटणारी विरार अंधेरी फास्ट एसी लोकल बोरिवली पर्यंतच धावणार आहे. तर आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी अंधेरी भाईंदर फास्ट एसी लोकल अंधेरी होऊन 11:55 मिनिटांनी सुटणार आहे. तर बोरीवली हुन 11:25 वाजता निघणार आहे.
24 सप्टेंबर 2024 रोजी ब्लॉक
दिनांक 24 सप्टेंबर 2024 ची वांद्रे बोरिवली लोकल सकाळी चार वाजून पाच मिनिटांनी वांद्रे ते गोरेगाव पर्यंत धावणार आहे तर गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान रद्द राहणार आहेत.
दिनांक 24 सप्टेंबर रोजी बोरीवली विरार ही लोकल बोरिवली इथून सकाळी आठ वाजून बारा मिनिटांनी सुटणार आहे . ही गाडी नालासोपारापर्यंत धावणार आहे. नालासोपारा स्टेशनवर ही गाडी शॉर्ट केली जाईल तर याच दिवशी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सुटणारी विरार बोरिवली स्लो लोकल बोरिवली अंधेरी वांद्रे दादर मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट मोडणं चर्चगेट पर्यंत धावणार आहे तर चर्चगेट बोरिवली लोकल चर्चगेट हून सकाळी नऊ वाजून 19 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट मुंबई सेंट्रल दादर वांद्रे अंधेरी बोरीवली दरम्यान फास्ट मोडणे नालासोपारापर्यंत धावेल.
तर दिनांक 24 रोजी भाईंदर होऊन सकाळी चार वाजून दहा मिनिटांनी सुटणारी भाईंदर चर्चगेट फास्ट लोकल चर्चगेट पर्यंत स्लो मोडणं धावणार आहे. तर बोरीवली चर्चगेट स्लो एसी लोकल बोरिवली होऊन 24 रोजी पहाटे चार वाजून 32 मिनिटांनी सुटेल ही ट्रेन अंधेरी वांद्रे दादर मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट डेट पर्यंत धावणार आहे.
भाईंदर चर्चगेट दुसरी फास्ट लोकल 24 रोजी पहाटे 4:45 मिनिटांनी सुटेल ही ट्रेन चर्चगेट पर्यंत स्लो मोडणे धावेल. वांद्रे स्लो लोकल विरार हून सकाळी सात वाजून पंचवीस वाजता सुटेल आणि स्लो मोडने धावेल , तर चर्चगेट हून सकाळी नऊ वाजून 23 मिनिटांनी धावणारी लोकल चर्चगेट विरार एसी लोकल चर्चगेट पासून मुंबई सेंट्रल दादर वांद्रे अंधेरी बोरिवली भाईंदर वसई विरार रोड दरम्यान फास्ट मोडणे विरार पर्यंत धावणार आहे. दरम्यान ब्लॉकमुळे गाड्या रद्द किंवा शॉर्ट करण्यात आल्यानं प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे