पुणे – बेंगलोर महामार्गावर उंब्रज जवळ मालट्रक पलटी

truck overturned
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे बंगलोर महामार्गावर कराड तालुक्याच्या हद्दीत उंब्रज जवळ भरधाव वेगाने जाणारा मालट्रक महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून जाग्यावरच पलटी झाला. रविवार दिनांक ७ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरु केली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून कोल्हापूर दिशेने मालट्रक निघाला होता, यावेळी उंब्रज गावच्या हद्दीत वरदराज मंगलकार्य नजीक भरधाव वेगात जात असताना ट्रकची धडक डिव्हायडरला बसली आणि ट्रक पलटी झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मालट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. उंब्रज पोलिसांनी तात्कळ घटनास्थळी धाव घेऊन पलटी झालेल्या मालट्रकाला रस्त्याच्या बाजूला केलं आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.