शाळकरी मुलीला धमकी देणाऱ्या तरुणावर साताऱ्यात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीला धमकी देत विनयभंग केल्याची घटना आज साताऱ्यात उघडकीस आली आहे. “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाइट करीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी संबंधित तरुणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवेज आतार (रा. सदर बझार, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसा साताऱ्यातील एका शाळेमध्ये १६ वर्षांची मुलगी शिकत आहे. ती दररोज जेव्हा शाळेत जाण्यास घरातून बाहेर निघाली कि परवेज तिचा पाठलाग करत. वारंवार पाठलाग करत असल्याने अखेर त्यामुळे त्या मुलीने त्या तरुणाला “तु माझ्या पाठीमागे का येतोस”, असे विचारले, यावेळी त्याने “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाइट करीन व मी तुझ्या पाठीमागे असाच येणार”, असे म्हणून त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची माहिती मुलीने आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी मुलीला घेऊन थेट सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी परवेज आतार याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोटे हे करीत आहेत.