फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे
मौजे सांगवी (ता.फलटण) गावचे हद्दीत मुरूम उत्खननाचा परवाना न घेता अनाधिकृतरित्या मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन करून, चोरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी संजय प्रल्हाद साळवे (रा.अंबिकानगर ,पणदरे ता.बारामती जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १५जून २०२१ रोजी रात्री १०.४५वाजण्याच्या सुमारास मौजे सांगवी ता.फलटण गावचे हद्दीत गायरान जमीन गट नंबर ४१२मध्ये जेसीबी क्रमांक MH 09 CL 0185 व त्यावरील चालक संजय प्रल्हाद साळवे रा.अंबिका नगर, पणदरे ता. बारामती जिल्हा पुणे याने मुरुम उत्खननाचा कोणताही शासकीय परवाना न घेतला नाही. तरीही बेकायदेशीररित्या मुरुमाची चोरी करण्याच्या उद्देशाने उत्खनन करून, चोरीचा प्रयत्न केला व पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी, हनुमंत उत्तम नागरवाड (वय -28 वर्षे) व्यवसाय नोकरी (तलाठी सांगवी) यांनी फिर्याद दिली.
दिलेल्या फिर्यादीवरून संजय प्रल्हाद साळवे यांचे विरोधात भा. द .वि .सं. कलम ३७९, ५११ व पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ९,१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अमोल कर्णे करीत आहेत.