ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांची तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी डिलाई रोड ब्रिजचं अनधिकृत उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, शिंदे गटाने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात नविन वाद निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनादिवशी झालेल्या वादानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाचे विभाग प्रमुख महेश सावंत यांच्याविरोधात देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादानंतर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंग केल्याचा आरोप लावला. या आरोपांच्या आधारे पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

दरम्यान, शिवसेनेतून शिंदे गट बाजूला पडल्यापासून ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल
होण्याचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यामुळे ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर ठाकरे गट शिंदे गटाविरोधात काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.