लहान चिमुकल्यांच्या खून प्रकरणी स्वतः च्या आईवर गुन्हा दाखल

Karad Police Staion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | स्वतःच्या दोन मुलांचा खून करित स्वतः विषारी औषध पिऊन हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, स्वतःच्या मुलांचा खून व स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आईवर खुनाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी, कराड शहरातील रुक्मिणीनगर येथील हर्ष सुजित आवटे (वय-8), आदर्श सुजित आवटे (वय- 6) या दोन मुलांचा खून स्वतःच्या आईनेच केला. तर अनुष्का सुजित आवटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुष्का आवटे यांचे पती सुजित आवटे यांचे सहा महिन्यापुर्वी अपघाती निधन झाले आहे. पतीच्या अपघाती मृत्यूमुळे अनुष्का आवटे या वैफल्यग्रस्त झाल्या होत्या. यातूनच त्यांनी पोलीस अधिकारी यांच्या नावे चिठ्ठी लिहून पतीचा विहर सहन होत नसल्याने आम्ही जीवन संपवत असल्याचे सांगितले.

बुधवारी सकाळी ही घटना समोर आल्यावर नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी मुलांसह अनुष्का आवटे यांना तात्काळ रुग्णालयात हलावल. मात्र, दोन्ही मुलांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. तर अनुष्का यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवार दि. 26 रोजी घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर स्वतःच्या दोन मुलांचा खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनुष्का यांच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील