कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आज शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कराड शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कराड शहरातील पाटण कॉलनी मध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. यावेळी नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेला माहिती दिल्याने अग्निशामक दलाने पुढील दुर्घटना टाळला.
कराड शहरासह तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची ये-जा सुरू आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याने व पावसाने मोठ्या प्रमाणावर ती जिल्ह्यात नुकसान केले . आज शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यावेळी वीज पाटण कॉलनीतील देशपांडे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर कोसळली. त्यामुळे नारळाच्या झाड पेटले होते.
कराड शहरात वीज कोसळल्याने नारळाचे झाड पेटले pic.twitter.com/hCGIZpmZL2
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) April 15, 2022
झाड पेटल्याने रहिवाशाच्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तात्काळ नगरपरिषदेला याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर कराड नगरपालिकेचे अग्निशामक दल यांनी घटनास्थळी धाव घेत नारळाच्या झाडावरील आग विझवली.