सांगलीच्या शेतकऱ्यानं ऊसात पिकवला तब्बल पाऊण किलो वजनाचा कांदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक येथे तर शेतकऱयांनी आक्रमक पावित्रा घेत बाजार समितीचे लिलावात बंद पाडले. कांदा उत्पादकांचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनातही चांगला गाजत आहे. अशात कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने चांगलीच कमाल करून दाखवली आहे. त्याने ऊसात कांद्याचे उत्पादन घेतले असून त्याच्या कांद्याच्या पीकात एक कांदा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी घेतलेल्या कांद्याच्या पीकात एक कांदा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे. हा कांदा पाहण्यासाठी सध्या परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.

सांगलीत यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्यांमध्ये पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे यांनी घेतलेल्या कांद्याची चांगलीच चर्चा होत आहे. सरासरी 700 ते 800 ग्रॅम इतक्या वजनाचा कांदा शिरगावे यांच्या शेतीत पीकला आहे.

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

Hanumant Shirgave

अशी केली कांद्याची लागवड

सांगली जिल्ह्यातील शेतकरी हनुमंत शिरगावे यांनी कांद्याची लागवड केली आहे.
कांदा लावणीसाठी बाजारपेठेतून सुरवातीला त्यांनी कांद्याचे तरु आणले. उसासोबतच दोनवेळा अळवणी केली. ऊसात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली. ह्युमिक, फुलविक, सिव्हिडची दोनवेळा फवारणी केली. ऊसाबरोबर कांद्याच्या रोपांना त्यांनी पाणी देणे सुरु केले. हळूहळू ऊसासोबतच कांद्यालाही मुबलक खतपाणी मिळत गेले. ज्यावेळी ऊसाला भरणी घालण्याची वेळ आली तेव्हा ऊसाच्या भरणीसाठी त्यांनी कांदा काढायला सुरुवात केली.

onion

कोणते बियाणे वापरावे?

कांदा लागवडीसाठी आपण एन-2-4-1 हे बियाणे आपण जर वापरले तर कांदा आकाराने गोलाकार आणि मध्यम ते मोठा सुद्धा होतो. शिवाय त्याला रंग लालसर येतो आणि कांद्याला चकाकी येते. हे कांदे जवळपास पाच ते सहा महिने चांगल्या प्रकारे टिकतात. लागवडीनंतर आपण 120 दिवसांनी काढणी केली तर हेक्‍टरी 25 ते 35 टन उत्पादन मिळते. आपल्याला कांदा उत्पादना करता भीमा शक्ती, अर्का निकेतन भीमा किरण, लाईट रेड, ऍग्री फाउंड हे बियाण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

लागवडीसाठी आवश्यक हवामान व हंगाम

रब्बी हंगामात कांद्याची लागवड करणे हे जास्त फायद्याचे ठरते. कांदा लावल्यापासून काही दिवस कांद्याला थंड हवामान हवे असते तर त्यानंतर कांद्याची वाढ होताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या कंद वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या आस-पास कांदा लागवड केली तर त्यावेळच्या थंडीचा उपयोग होतो आणि जानेवारी महिन्यातील स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कांदा चांगला पोसला जातो. त्याचसोबत खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात देखील कांदा लागवड केली जाते. खरीप हंगामात लागवड करताना जुन-जुलै महिन्यात करावी तर उन्हाळी हंगामात कांदा लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.

onion seeds

कोणते वाण वापरावेत?

1) बसवंत 780 : खरीप व रब्‍बी हंगामासाठी ही जात योग्‍य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

2) एन – 53 : ही जात खरीप हंगामासाठी योग्‍य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्‍टरी उत्‍पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.

3) एन- 2-4-1 : ही जात रब्‍बी हंगामासाठी योग्‍य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्‍यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्‍या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल मिळते.

4) पुसा रेड : कांदे मध्‍यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्‍यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. लागवडीसाठी एकरी कांद्याचे 4 ते 4.5 किलो बियाणे आवश्यक असते.