हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा येथील एका विहिरीत जंगली कोल्हा पडल्याची घटना घडली असून त्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. वन विभागाच्या अधिकारी व पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाने ही बचावकार्याची मोहीम राबविली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर हद्दीत शनिवारी अन्नाच्या शोधात असलेला जंगली कोल्हा उघड्या विहिरीत पडला. ही गोष्ट स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
अन्नाच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची केली सुटका… pic.twitter.com/Jg5QbA8QvY
— santosh gurav (@santosh29590931) April 11, 2023
संबंधित कर्मचाऱ्यांनी कोल्हा जिवंत असल्याचे पाहताच सोबत आणलेला सापळा पिंजरा विहिरीत उतरवला. काही वेळानंतर कोल्हा त्या पिंजऱ्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पिंजरा बाहेर काढला आणि कोल्हाला जवळच्या सुरक्षित ठिकाणी नेऊन लगेच जंगल प्रवणक्षेत्रात सोडण्यात आले.