उदयनराजेंच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर

Udayanraje Bhosale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहराच्या दक्षिणेकडे विलासपूर आणि लगतच्या परिसरातील सुचवलेली साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून नुकतीच मंत्रालयातून या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले.

या कामांमध्ये विलासपूर येथील फॉरेस्ट कॉलनी गणेश नगरलगत ओढ्याला वॉकिंग ट्रॅक आणि ड्रेनेज सिस्टीम करणे एक कोटी 35 लाख, गोळीबार मैदानातील साई कॉलनी ते पालवी चौक दोन्ही बाजूंनी सिस्टीम रस्ता करणे एक कोटी दहा लाख , काळंबीचा ओढा येथे साकव पूल बांधणे 30 लाख ,साई कॉलनी येथील ओपन स्पेस मध्ये वॉकिंग ट्रॅक ओपन जिम 30 लाख ,सुतार कॉलनी येथील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे 30 लाख, सुतार कॉलनी येथील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे 30 लाख ,नंदादीप गृहनिर्माण संस्थेमध्ये अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे दहा लाख,अवि कॉलनी येथील 100 मीटर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणे दहा लाख, बापूजी साळुंखे नगर व शिवशक्ती नगर येथे डांबरीकरण दहा लाख, गणेश नगर ते गणेश नगर फॉरेस्ट कॉलनी यांना जोडणारा रस्ता डांबरीकरण खडीकरण करणे दहा लाख,कारंजकरनगर येथे रस्ता डांबरीकरण करणे दहा लाख, विनायक हाऊसिंग सोसायटी येथील रस्ते खडीकरण व डांबरीकरण 15 लाख ,सहजीवन सोसायटी येथील मोकळ्या जागेत बाग बगीचा विकसित करणे 30 लाख ,राधिका नगर येथे बंदिस्त कटर बांधकाम 10 लाख,पायरी पार्क गोळीबार मैदान येथील ओपन स्पेस विकसित करणे 20 लाख, अशा 14 कामांना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या संदर्भातील प्रस्ताव संग्राम बर्गे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यामार्फत नगर विकास विभागाकडे सादर केला होता उदयनराजे यांनी या 14 कामांविषयी सातत्याने पाठपुरावा करून विलासपूर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे या कामाच्या निविदा लवकरच काढल्या जाणार असून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले