मोबाईल चोरट्यांची टोळी गजाआड

औरंगाबाद : जाधव मंडीमध्ये वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीला सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अटक केली आहे. 14 जणांची टोळी चोरी केलेल्या मोबाइलची विक्री करण्यासाठी चक्क कारने नगर बीड जिल्ह्यातून आली होती. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

या भागात मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले असून वाहनचोरी मंगळसूत्र हिसकावण्यात गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेताना पेट्रोलिंग सुरू असताना निरीक्षक अशोक गिरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा मारत कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको ठाण्याचे विशेष पथकाला पिसादेवी रोड वरील वैशाली धाब्याजवळ बाहेरील जिल्ह्यातील चार जण स्विफ्ट कारमध्ये येऊन शहरात चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

त्यावरून श्रीगिरी यांनी विशेष पथकातील उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर व त्यांच्या पथकाने सापळा लावला असता राठी संसार समोर रस्त्याच्या बाजूला एम एच 11 बिडी 6168 ही स्विफ्ट कार उभी दिसली त्या कारमध्ये समोर दोन पाठीमागे 224 संशयित यादीतलेचे सदस्य तसेच सदर कार बाहेरच्या जिल्ह्यातील पासिंग पथकाचा समस्या आणखीनच बळावला दरम्यान लपत-छपत दुचाकीवर संस्थापक अचानक छापा म्हणून चौघा संशयितांना अटक करण्यात आली. परशुराम मोहन गायकवाड ( 21, एकनाथवाडी ता. पाथर्डी, जि. नगर ह. मु. आकाशवाणी केंद्र, कंकाळेश्वर शाळा, ता. जि. बीड ), प्रवीण राजू जाधव (19, रा. वा कुंडी नाका शास्त्रीनगर, ता. जि. बीड, सनि विजय पतंगे, ( 25, रा. गांधीनगर नवले शाळा जर बीड या चौघांना ताब्यात घेत झडती घेतली. असता तुमच्याकडून पाच मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. संशयितांच्या ताब्यातून 5 मोबाईल्स चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला ही कारवाई पण निरीक्षक बाळासाहेब आहेर आदर्श शिंदे व नरसिंग पवार निलेश सावंत प्रकाश ठोंबरे संतोष समुद्री गणेश नगरे सुरेश भिसे विशाल सोनवणे स्वप्नील रत्नपारखी यांनी केली.