सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
चारचाकी, दुचाकी वाहने व साईटवरील साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी तीन मोटार सायकली, एक चारचाकी वाहन व कंपाऊंडच्या जाळया. अॅल्युमिनीअमची तार असा एकूण 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एका सराईत गुन्हेगारासह 3 आरोपी व एका अल्पवयीन बालकाचा सहभाग असुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहरातुन वाहन चोरी व बांधकाम साईटवरील साहित्य चोरीस जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा. बापू बांगर अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा यांनी शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींवर लक्ष्य ठेवण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अभिलेखावरील आरोपींची माहिती घेत असताना त्यांना दि. 26/05/2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, अभिलेखावरील मालमत्तेच्या गुन्हयातील सराईत चोरटा हा त्याच्या साथिदारांसह चोरीच्या कंपाऊंडच्या जाळ्या व अॅल्युमिनीयमची तार विक्री करण्यासाठी करंजे येथील आंदेकर चौक परिसरात आलेला आहे. अशी माहिती मिळाली. त्यानंतर शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तात्काळ करंजे परिसरात जावुन नमुद इसमाचा शोध घेत असताना अभिलेखावरील सराईत चोरटा हा एका चारचाकी वाहनात व त्याचे साथिदार हे मोटार सायकलीवर बसले असल्याचे दिसुन आले. पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरील त्याचे साथिदार व सराईत चोरटा पळून जावु लागले त्यावेळी पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी सराईत चोरट्यास पकडले. सदर चोरट्याकडे विचारपुस केली असता त्याने आम्ही कंपाऊंडच्या जाळ्या व अॅल्युमिनीअमची तार विक्री करण्यासाठी क्वालीस गाडीतून घेवून आलो आहे असे सांगितले. त्याप्रमाणे पोलीसांनी सराईत चोरटा बसला असलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमिनीअमची तार दिसुन आली. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने इतर साथिदारांच्या मदतीने म्हसवे गावच्या हद्दीतुन कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमिनीअमची तार चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याच्याकडे चारचाको क्वालोस गाडी बाबत विचारपुस केली असता त्याने कंपाऊंडच्या जाळ्या चोरी करुन नेण्यासाठी अनंत इंग्लिश स्कुल, साताराच्या जवळुन क्वालीस चोरी केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या साथिदारांच्याबाबत विचारपुस केली असता त्याने त्याच्या साथिदारांची नांवे सांगुन त्या सर्वांनी मिळुन भोसले मळा, कंरजे व विठोबाचा नळ परिसरातुन अपमिंटच्या पार्कंगमधुन आणखी दोन शाईन मोटार सायकलींची चोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याच्या साथिदारांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांच्याकडे चोरीच्या दोन्ही शाईन मोटार सायकली मिळून आलेल्या आहेत.
सराईत गुन्हेगारांच्या साथिदारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे गुन्हे पथकाने कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्यांनी दि.12/05/2023 रोजी झेंडाचौक, करंजे परिसरामध्ये राहणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसून त्या परप्रांतिय माणसास मारहाण केली तसेच त्याच्या घरातील पैशाची बॅग जबरीने चोरुन नेल्याची कबुली देवुन त्या पैशातून पल्सर मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट खरेदी केली असल्याची माहिती दिली. त्यांनी चोरीच्या पैशातुन खरेदी केलेली मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट गुन्हयाचे कामी जप्त करणेत आले आहे. एकदंर संशयीत आरोपीनी दिले माहितीच्या आधारे पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता शाहुपूरी पोलीस ठाणेस दोन मोटार सायकल चोरीचे. एक क्वालीस चारचाकी चोरीचा एक जबरी चोरीचा तसेच सातारा तालुका पोलीस ठाणेस कंपाऊंडच्या जाळ्या चोरीचा असे एकूण 5 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर चोरट्यांकडुन पाचही चोरीचे गुन्ह्यातील एकुण 3,67,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये तीन मोटार सायकली, एक चारचाकी वाहन व कंपाऊंडच्या जाळया. अॅल्युमिनीअमची तार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात सराईत गुन्हेगारासह 03 आरोपी व एका अल्पवयीन बालकाचा सहभाग असुन तीन आरोपींना तपासकामी अटक करणेत आली आहे.
सदर गुन्हयातील सराईत चोरट्याचे विरुध्द जबरी चोरी व चोरीचे एकूण 16 गुन्हे दाखल असून त्यास यापूर्वी शाहुपूरी पोलीस ठाणेचे प्रस्तावावरुन मा. पोलीस अधीक्षक, सो सातारा यांनी 02 वर्ष कालावधीकरीता तडीपार केले होते. अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सतर्क पेट्रोलींग करुन चारचाकी, दुचाकी, कंपाऊंडच्या जाळ्या, अॅल्युमिनीअमची तार चोरी करणारी व जबरी चोरी करणारी टोळी सराईत गुन्हेगारासह जेरबंद करून जबरी चोरी, वाहनचोरी व अॅल्युमिनीअम तार, जाळ्या चोरीचे एकुण 05 गुन्हे उघडकीस आणुन आरोपींचेकडुन एकूण 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.