हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जीवन हे खूप मुश्किल आहे. जीवनात अनेक चढ – उतार असतात. कोणाला जिवंत ठेवणे, आणि कोणाला संपवणे हे ईश्वराचा हाताचा खेळ आहे असे म्हंटले जाते. परंतु हे सारे खेळ नशिबाचा एक भाग असतो. जीवन जगायचे म्हंटले तरी त्यापाठीमागे अतोनात कष्ट असतात. कधीकधी आपल्याला अपेक्षित नसलेल्या गोष्टी आपल्या समोर घडतात. साऱ्या घटनांना सामना करत जीवन जगावे लागते. अशीच काहीशी घटना दोन महिन्याच्या असलेल्या छोट्या मुलीबाबत घडली आहे.
मुलीचे आई वडील डेनियल आणि रोजर यांनी फक्त सहा महिने झालेल्या छोट्या मुलीला जन्म दिला. ४५० ग्रॅम वजन भरलेली हि मुलगी जन्माली खरी, परंतु तिच्या शरीरातले बरेच अवयव तयार झाले नाहीत. नाक, ओठ डोळे यातले काहीच अवयव तयार झाले नाहीत . तरीही हि मुलगी आयुष्यात तग धरून जगण्याची धडपड करत आहे. तीन महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या या मुलीला डॉक्टरांनी फक्त ५०%जगण्याची शकयता वर्तवली होती. २४ महिन्यांची झालेल्या या मुलीला जन्मताच आयसीयूमध्ये दाखल केले गेले. तिचे आई वडील मात्र या धक्यातून सावरले गेले नाहीत. या लहान मुलीवरती खूप सारे उपचार केले गेले आहेत. तिला लहान वयातच अनेक सर्जरींना सामोरे जावे लागले आहे.
डेनियल आणि रोजर या पति-पत्नींना यापूर्वी अजून एक मोठी मुलगी आहे. मुलीची आई हि पहिल्यापासूनच खूप कमजोर होती. दुसऱ्या मुलीच्या वेळी मात्र डॉक्टरांनी खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन गर्भाशयात असल्याचं म्हंटल होत. परंतु दोघा पती-पत्नींने मिळून या मुलीला जन्म दयायचा असं ठरवलं होत. सुरुवातीलच्या काळात डेनियल ला खूप त्रास झाला. अनेक वेळा ऍडमिट करावे लागले दिवसेंदिवस श्वास घेण्याची समस्या उद्भवू लागली होती. या सर्व गोष्टींवर मात करत डेनियल ने मुलीला जन्म दिला खरा परंतु ती जगेल कि नाही याची शंका जास्त होती. परंतु या छोट्या मुलीने आईसारखी अनेक गोष्टींवर मात करत १३० दिवस हॉस्पिटल मध्ये राहत काल तिला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले आहे. तिच्या आई वडिलांनी तिचे घरी स्वागत करत नवीन फोटोशूट पण करण्यात आले आहे. तिच्या जगण्याच्या या धाडसाला सलाम करत अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.