औरंगाबाद | पंधरा दिवसापूर्वी सरासरी 20 च्या घरात असलेली कोरोनाबाधितांची त्यांची संख्येत आता वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दररोज 30 रुग्ण वाढत असल्याने, जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा दोनशेच्या पार गेल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण व्यतिरिक्त आता शहरातही कोरोनाबाधितांची त्यांची संख्या वाढत आहे.
गेल्या काही महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक दिलासादायक ठरला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यानंतर रुग्ण संख्येत घट झाली आहे. कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र जिल्ह्यात होते. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटी बाबत अंदाज वर्तवले जात आहेत.
त्यातच जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही सतर्क झाले होते. परंतु हा दिवसात रुग्ण ठणठणीत असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान, मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्याचा आलेख पुन्हा एकदा वर सरकू लागला आहे.