अशोक चव्हाण यांना मूर्ख म्हणणारा महामूर्ख -शिवाजीराव मोघे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : विनायक मेटे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या मेळाव्यात मुंबई येथे मोटरसायल रॅली काढू अशी घोषणा केली परंतु आज मराठा आरक्षण न टिकण्यामागे राज्य सरकार आणि अशोक चव्हाण जबाबदार असून अशोक चव्हाण यांना विनायक मेटे हे मूर्ख माणूस म्हणाले असता माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पाटील यांनी मेंटेवर पलटवार करत जो कुणी अशोक चव्हाणांना मूर्ख म्हणणारा व्यक्ती असेल तो महामुर्ख असेल असे वक्तव्य केले.

असे वक्तव्य करताना माणसात सुसंस्कृत पणा असायला हवा तो नसेल तर राजकारण करू नये,वैतागल्या सारखे करू नये असा अप्रत्यक्षपणे विनायक मेटे यांना सल्ला दिला,आम्ही मराठा आरक्षणासाठी बार्टीचे पैसे वापरले असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.

राज्य सरकारच्या विरोधात आज शिवसंग्रामचे विनायक मेंटेची मोटारसायकल रॅली असताना यावर मोघे म्हणाले की लोकशाही मध्ये मोर्चे काढायला बंधन नाही. कुणीही काढू शकतो.

Leave a Comment