साताऱ्यात ‘सिटी वाईन्स शॉप’च्या पाठीमागील गोदामास भीषण आग

Satarat Shop Fire

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा येथे रविवारी राधिका रोडवर असलेल्या ‘सिटी वाईन्स शॉप’च्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोदामास भीषण आग लागण्याची घटना रविवारी घडली. या घटनेत गोदामातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सातारा येथे सिटी वाईन्स शॉपच्या पाठीमागील बाजूस रविवारी दुपारी आग लागण्याची घटना घडताच परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ उडून गेला. नागरिकांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक विभाग व पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस व अग्निशामक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक पथकातील कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या गोदामातील गाळ्यात जाऊन पाण्याच्या साह्याने आग विझवण्यास सुरुवात केली.

वाईन्स शॉपच्या पाठीमागील गोदामास लागलेली आगीची घटना इतकी भीषण होती कि आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोट परिसरात पसरू लागले. आगीमुळे इतर दुर्घटना घडू नये म्हणून या परिसरातील वीज पुरवठाही काही काळ बंद करण्यात आला. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.