सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात नुकतेच अवकाळी पावसानी झोडपून काढले. सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने पहाटेच्यावेळी धुके पडू लागले आहेत. अशात तापोळा-बामणोली परिसरात पहाटेच्यावेळी सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. या भागातील डोंगररांगा धुक्यानी पांढर्या शुभ्र होत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. यानंतर वातावरणामध्ये पूर्णतः बदल झाला. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले तर अनेक वृक्ष उन्मळून पडली. काही ठिकाणी ओढे, नाले भरून वाहू लागले.
सातारा जिल्ह्यातील 'या' ठिकाणी पसरलीय धुक्याची चादर pic.twitter.com/HbKeGRC81w
— santosh gurav (@santosh29590931) March 21, 2023
जावली तालुक्यातील सह्याद्रीनगर या ठिकाणी अवकाळी पावसानंतर धुक्याची चादर बसली होती. या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनुभवता आला. या ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याने येथे स्वर्गातील वातावरणाची अनुभूती येत आहे.