सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पसरलीय धुक्याची चादर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात नुकतेच अवकाळी पावसानी झोडपून काढले. सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने पहाटेच्यावेळी धुके पडू लागले आहेत. अशात तापोळा-बामणोली परिसरात पहाटेच्यावेळी सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. या भागातील डोंगररांगा धुक्यानी पांढर्‍या शुभ्र होत आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. यानंतर वातावरणामध्ये पूर्णतः बदल झाला. मोठ्या … Read more

जावलीत वाजत गाजत निघाली ढवळ्या-पवळ्यांची मिरवणूक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील जावली तालुक्यातील तापोळा विभागात बेंदूर सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारशीच्या दिवशी बेंदूर सण साजरा करण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. त्यानुसार जावळी तालुक्यातील आपटी गावातील 100 बैलजोड्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तापोळा विभागातील तापोळा, फुरूस, हातरेवाडी , मांटी, आपटी येथील … Read more

जावलीतील शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी सेवा दुकानांची चौकशी करा : किरण बगाडे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुका हा दुर्गम तालुका असून खरीप पिक हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये दुकानदार कृषी सेवा केंद्राच्या गोंडस नावाखाली खताचे बी- बियाण्यांचे दर मनमानी पद्धतीने अवाजवी दर लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खतांचा साठा करून ठेवणाऱ्या कृषी दुकानदारांवर कारवाई करा, अशी मागणी आरपीआयचे जिल्हा सचिव किरण … Read more

एकनाथ शिंदेंजी तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पहायचंय…

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि 10 अपक्ष आमदार फोडल्यामुळे त्यांचे सध्याचे राजकीय वजनही वाढले आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांकडून पाठींब्याचे फलकही लावले आजच्या आहे. आता त्यांचे जावली तालुक्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथील ग्रामस्थांकडून … Read more

जावळीचे सुपुत्र विक्रम देशमाने यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात अनेक जणांकडून गौरवास्पद कामगिरी केली गेली आहे. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. आता अजून एक गौरवास्पद अशी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी हि जावळी तालुक्यातील सुपुत्र व ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक पदावर काम करत असलेले विक्रम नंदकुमार देशमाने यांनी केल्याबद्दल त्यांचा नुकताच राष्ट्रपती पोलिस … Read more

प्रतापगड सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक पॅनेलचा 21-0 असा विजय

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. 21 जागांपैकी तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आल्यानंतर आज 18 जागांसाठी मतमोजणी करण्यात आली. यावेळी संस्थापक सहकार पॅनेलने पूर्ण बहुमत मिळवत 21-0 असा विजय मिळवला. सोनगांव … Read more

प्रतापगड साखर कारखाना निवडणुकीत कुसुम गिरी व बाळकृष्ण निकम विजयी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. कारण तालुक्यातील सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. 21 जागांपैकी तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आल्यानंतर उरलेल्या 18 जागांसाठी काल 13 मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले. उर्वरित जागांसाठी आज … Read more

जावली तालुक्यात मामुर्डीत आगीत दोन घरे जळून खाक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे घरात पेटवलेल्या दिव्याच्या माध्यमातून आग लागतयाची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबात अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे आग लागण्याची घटना घडल्यानंतर … Read more

निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घालणार घेराव; आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीस आता आरपीआय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. आज रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी उपनिबंधक जावळी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. तसेच कारखान्याची निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घेराव घालू, असा … Read more

कार्यकर्ता हेच पक्षाचे बलस्थान आहे – प्रवीण दरेकर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जावळी तालुक्यातील करहर येथे भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी “कार्यकर्ता हे पक्षाचे बलस्थान आहे. या करिता कार्यकर्त्यामध्ये मिसळून स्वतः कार्यकर्ता झालं तर कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन पक्षकार्य जोमात होते. याच माध्यमातून गावोगावच्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयातून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेऊन … Read more