व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड- ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार झाला आहे. विंग ते चचेगाव दरम्यान कणसे मळा परिसरात ही घडली घटना. अंदाजे 3 ते 4 महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला असून वनविभागाने घेतला मृतदेह ताब्यात घेतला आहे.

घटनास्थळावरून व वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कराड- ढेबेवाडी रस्त्यावर कणसे मळ्यात अज्ञात वाहनाने बिबट्याच्या बछड्याला धडक दिली. यामध्ये बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या बिबट्याच्या बछड्याचे वय अंदाजे तीन ते चार महिने असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान मृत झालेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अज्ञात वाहनाने धडक दिली त्या वाहना बाबत तपास सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याच्या या वावरामुळे या परिसरात आणखी बिबट्या असण्याच्या शक्यतेमुळे चचेगाव, येरवळे, विंग परिसरातील शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.