Thursday, October 6, 2022

Buy now

कृष्णा नदीकाठी शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबट्या सापडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगळूर महामार्गावरील खोडशी (ता. कराड) येथे आज मंगळवारी दि. 8 रोजी पहाटे बिबट्या सापडला आहे.  शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकला. बिबट्या सापडल्याने खोडशीसह परिसरातील गोटे, वनवासमाची गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

कराडनजीक खोडशी येथे कृष्णा नदी कडेला सावकार वस्ती नजीक शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. पहाटे बाळासाहेब पाटील यांच्या गुऱ्हाळ घरावरील काही लोक मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. तेव्हा कोणत्यातरी प्राण्याचा आवाज येत असल्याचे घटनास्थळावरील लोकांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी पुढे जावून पाहिले असता बिबट्या असल्याचे दिसून आले. यानंतर आता खोडशी भागात बिबट्याचा वावर असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. आज सकाळी कृष्णा नदीकडेला म्हसोबा मंदिरावजवळ बिबट्या फासकीत अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले.

सकाळी वनविभाग पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. आज दाट धुके पसरले होते सावकर वस्ती येथे शेतकन्याला बिबट्या फासकीत अडकल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली.