शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नये; प्रकाश आंबेडकर यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली होती. दरम्यान, आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद रंगला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत. खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावे, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.

प्रकाश आबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवे होते. त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाही.”

“मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक करण्यावरून केल्या जात असलेल्या राजकारणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला. शिवाजी पार्क हे मुंबईतील एक मैदान आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. त्या ठिकाणी स्मशानभूमी केली जाऊ नये,” असे आंबडेकर यांनी यावेळी म्हंटले.