रामोशीवाडी नजीक महेंद्रा पिकअप व स्कार्पिओची समोरासमोर धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुसेगाव ते कोरेगाव दरम्यान रामोशीवाडी (ता. कोरेगाव) नजीक डॉक्टर भुतकर यांचे आरोग्य ऊर्जालया समोर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा पिकअप आणि स्कार्पिओ समोरासमोर धडकली. वडापच्या काळी पिवळी महिंद्रा पिकअपमध्ये 7 प्रवाशी होते. या अपघातात तीनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दहिवडीकडून सातारकडे जाणारी वडापची महेंद्रा पिकअप क्रमांक (एमएच- 11- एम- 0954) व भाटमवाडी वरून कोरेगावच्या दिशेकडून पुसेगावकडे येणारी स्कार्पिओ क्रमांक (एमएच- 06- डब्लू- 2223) यांची रामोशीवाडी नजीक समोरासमोर धडक झाली. अपघातात महिंद्रा पिकपचे चालक वैभव लांबाटे (रा. महिमानगड, ता. माण) व स्कार्पिओचे चालक राजेंद्र मगटराव बुधावले (रा. भाटमवाडी, ता. कोरेगाव) हे जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर स्कार्पिओ ही अचानक विरुद्ध दिशेला गेल्यामुळे ती महिंद्रा पिकपवर आदळली. रस्त्यालगत असलेल्या शिवाजी शिरतोडे यांच्या माळरान शेतामध्ये गेली. सदर अपघाताचे कारण कळू शकले नाही. अपघातस्थळी कोरेगाव पोलीस स्टेशनचे व पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.