औरंगाबाद : क्रांती चौकाकडून सिडकोकडे भरधाव वेगाने कार सेव्हन हिल उड्डाणपुलावर येताच ट्रकने हुल दिल्याने थेट दुजाभकावर जावून आदळली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. हा अपघात भीषण होता,की कार दूजाभकावर चढल्याने ५० फूट घासत जाऊन समोर लावलेल्या दुजाभकावरील अँगल घुसल्याने कार अडकून थांबली तसेच कारमधील एअर बॅग फुटल्याने यात बारावीत शिकणारा मुलगा जखमी झाला. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मात्र; अपघातात कार समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला होता.
या संदर्भात सुनील टेकाळे ( रा. एसबीओए शाळेसमोर नंददीप सोसायटी) याच्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार (एमएच २०, ईजे ९६१३) त्यांचे बंधू तथा पाथरीकर महाविद्यालय प्राचार्य अरुण टेकाळे यांच्या मालकीची असून सुनील हे स्वतः कार चालवत औंरंगपुऱ्याकडून क्रांती चौक मार्गे सिडकोकडे जात होते. यावेळी कारमध्ये अरुण टेकाळे याचा मुलगा अर्थव (२०) आणि त्याचा मित्र होते. सुनील टेकाळे यांनी सांगितले, की कार सेव्हन हिल उड्डाणपुलावर आली असताना ट्रकने. हुल दिली. त्यामुळे कारचे स्टीअरींग दुजाभकावर फिरवली असता, कार वरती चढली. स्टीअरींग परत वळविले पण लॉक झाल्यानंतर होते तसे झाल्याने स्टीअरींग वळले नाही.मात्र प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, कारचा वेगही जोरात होता. का नियंत्रण सुटल्याने कार दुजाभकावर जावून आदळली.
अरुण टेकाळे यांच्या नातेवाईकावर एम जी एम रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याने सुनील हे सिडकोतून एम जी एम रुग्णालयात डबा देण्यासाठी जात होते. दरम्यान हा अपघात झाला घटनास्थळी जिनसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश एम.केंद्रे यांनी तात्काळ धाव घेतली. तसेच केंद्रे यांच्यासह वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक अशोक शिर्के,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर चव्हाण, अवध सोंगकलागी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान,कारमधील ऑईल रस्त्यावर सांडल्याचे कळताच अग्निशमन दलाचे सिडको प्रमुख विजय राठोड,रमेश सोनवणे,श्री कृष्ण होळबे,बापू घरत, माजेद खान,आदिनाथ बकले आणि अब्दुल हमीद यांनी धाव घेत रस्ता स्वच्छ करण्यात आला,रात्री उशिरापर्यंत जिनसी पोलीस ठाण्यात गुन्हा