अविश्वास ठराव मंजूरीसाठी 2 तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे; उच्च न्यायालयाचा निर्णय

Bombay High Court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यादरम्यान, उच्च न्यायालयाने देखील एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल देताना, ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. या सदस्यांच्या बहुमतावर सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते” असे म्हणले आहे. सध्या या निकालाचे याचिकाकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यंतरी कर्जत नेरळ येथील ममदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दामा निरगुडा व इतर सात सदस्यांनी गैर वर्तणूक करणाऱ्या उर्फ सरपंचाला पदावरून हटवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. यावेळी त्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत अॅड. प्रशांत राऊळ यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. याचिकेच्या सुनावणीमध्ये, जर दोन तृतीयांश सदस्यांनी जरी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केला तर सरपंच व उपसरपंचाला पदावरून हटवता येऊ शकते, असे आपल्या निर्णयात न्यायालयाने नमूद केले आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांकडून अविश्वास ठराव आणल्या गेल्यानंतर, उपसरपंच चंद्रकांत शिनरेने यांनी जिल्हाधिकाऱयांकडे अपिल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पूर्वी न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा संदर्भ घेत उपसरपंचाची अपील दाखल करून घेतली होती. परंतू या पिल्याला आवाहन करत ग्रामपंचायत सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने या सदस्यांच्या बाजूने निकाल सुधारला आहे.