येणकेत नरभक्षक बिबट्या पकडला अन् पुन्हा 3 पिल्ल…

Leopard Cubs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील विंग येथे बिबट्याची तीन पिल्ले अढळल्याची घटना ताजी असताना पुन्हा विभागातील येणके (ता.कराड) येथे बीबट्याची अणखी तीन पिल्ले अढळून आली. ऊसतोडणी सुरू असताना एका शेतात पिल्लाचे दर्शन झाले. आता कराड वनविभागाकडून पिल्लाचे आईशी पुर्नमिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न त्याठिकाणी सुरू आहेत. येणके येथे काही महिन्यापूर्वी बिबट्याने एका लहान मुलाचा जीव घेतला होता. त्यानंतर त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा बिबट्याची 3 पिल्ले सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

याबाबत ग्रामस्थ अणि वनविभागाने दिलेली माहिती अशी, येणके गावच्या पुर्वेस वांग नदीकाठ परिसरात मळा नावाचे शिवार आहे. त्याठिकाणी भास्कर विठ्ठल गरूड यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना तोडणी मजूरांना आचानक पिल्लाचे दर्शन झाले. त्याच्यांच थोडे भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यानीच त्या परिसरातील शेतकऱ्यांना घटनेची माहिती दिली. कराड वनविभागाला पाचारण केले.

कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपरिमंडल अधिकारी बाबुराव कदम, वनरक्षक शंकर राठोड, वनसेवक अरूण शिबे व मयुर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पिल्लाना ताब्यात घेतले आहे. पिल्लाचे आईसी पुर्नमिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एका प्लास्टीक बकेटमध्ये पिल्लाना ठेवले आहे. पिल्ल 8 ते 10 दिवसाची असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून पुण्यावरून खास पथक त्यासाठी पाचारण केले असल्याची माहिती वनविभागाने दिली.