हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज म्हणजे 27 डिसेंबर रोजी पृथ्वीवर एक मोठे संकट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. ख्रिसमसच्या दिवशी सूर्यावर झालेल्या एका स्फोटामुळे एक विशाल सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे सौर वादळ कधीही पृथ्वीवर धडकू शकते. यामुळे काही ठिकाणी वीज जाण्याची आणि मोबाईल नेटवर्क बंद पडण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर रोजी रात्री सूर्याच्या पृष्ठभागावर एक कोरोनल मास इंजेक्शन म्हणजेच एक मोठा स्फोट झाला होता. हा स्पोर्टबरोबर पृथ्वीच्या बाजूला असणाऱ्या भागांमध्ये झाला आहे. ज्यामुळे आता कित्येक मॅगनेटिक वेव्ह्ज पृथ्वीच्या दिशेने येऊ लागले आहेत. परिणामी पृथ्वीवर आज जिओमॅन्गेटिक वादळं येण्याची शक्यता नासाच्या शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
पृथ्वीवर काय परिणाम होणार?
सौर वादळाचा मोठा फटका सॅटेलाईट्सना बसू शकतो. यासोबतच पृथ्वीच्या उत्तरेकडे असणाऱ्या भागात देखील या सौर वादळाचा फटका बसू शकतो. पृथ्वीच्या मॅगनेटिक फील्डमधून वेव्ह्ज गेल्यास पृथ्वीवर G1 स्तराचे जिओमॅग्नेटिक वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, या वादळामुळे नॉर्दन लाईट्स (Auroras) देखील पहायला मिळू शकतात.