यवतेश्वर येथे उद्या संभाजी ब्रिग्रेडच्या राज्य कार्यकारणीची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

यवतेश्वर (ता. सातारा) येथील यवतेश्वर मल्टिपर्पज हॉलमध्ये उद्या रविवारी दि. 17 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित राहणार असून, याच ठिकाणी दुपारी उद्योगविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, शिवम कदम उपस्थित होते.

मराठा समाजाचे सद्यःस्थितीतील प्रश्न व पुढील दिशा, व्यवसाय क्षेत्रातील विविध संधी आणि इतर बाबींवर प्रबोधन करण्यासाठी राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार असून, दुसऱ्या सत्रामध्ये उद्योग परिसंवाद होणार आहे. या दोन विषयांवर कार्यकारिणीमध्ये चर्चा होणार असून, यासाठी प्रवीण गायकवाड, आमदार शशिकांत शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये गुरुदत्त काळे, राजेंद्र काकडे, बबनराव शेळके, रणजित शिंदे, संपत मोरे आदी कृषी व्यवसाय, उद्योग व व्यापार क्षेत्राच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.

या वेळी यशस्वी उद्योजकांचाही सत्कार करण्यात येणार असून, त्यानंतर ऑस्ट्रेलिया- तहद कॅनडा, अवघा मुलूख आपला, या आर्थिक सक्षमीकरणाच्या संकल्पनेवर प्रवीण गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही प्रदिप कणसे, अनिल जाधव, शिवम कदम यांनी केले.