मुंबईत तयार होतोय नवीन टर्मिनस; कोकणात प्रवास होणार आणखीन सोपा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईकर आणि कोकणप्रेमींनो, ही तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईसाठी एक नवा प्रवासद्वार उघडण्याची तयारी केली आहे. वसई रोडजवळ नव्या कोचिंग टर्मिनसची तयारी सुरू झाली आहे आणि यामुळे कोकणसह अनेक दिशांमध्ये प्रवास आणखीन सहज आणि सोयीस्कर होणार आहे.

वसई रोडजवळ नवीन टर्मिनस

पश्चिम रेल्वेच्या 2023-24 प्रकल्पांतर्गत वसई रोड येथे नव्या टर्मिनसला मंजुरी मिळाली असून, 150.26 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचं काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातल्या प्रवाशांना थेट मेल/एक्सप्रेस गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

टर्मिनसची रचना

या टर्मिनसमध्ये एक आयलंड प्लॅटफॉर्म असेल, ज्यावर दोन्ही बाजूंनी ट्रेन थांबतील. उर्वरित मार्गिकांवर ट्रेन पार्किंगसाठी जागा असेल.
या नव्या रचनेमुळे एकाच वेळी अनेक गाड्या हाताळण्याची क्षमता वाढेल.या टर्मिनसच्या मदतीने आणखी 12 नवीन मेल/एक्सप्रेस गाड्या चालवता येणार आहेत, त्यामुळे कोकणसह इतर राज्यांतही थेट जोडणी होईल.

जोगेश्वरी टर्मिनस

याच दरम्यान जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान देखील नवा टर्मिनस वेगाने उभारला जात आहे. 70% काम पूर्ण झालं असून, ऑक्टोबर 2025 पर्यंत तो प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. यामध्ये 2 प्लॅटफॉर्म, 3 मार्गिका, फूटओव्हर ब्रिज, 5 मजली स्टेशन इमारत आणि 2 मजली सेवा इमारतींचा समावेश असेल.

मुंबईसाठी आणि कोकणात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी ही बातमी म्हणजे पर्वणी आहे. वसई रोड आणि जोगेश्वरी येथे उभ्या राहत असलेल्या नव्या टर्मिनसमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेवरचा ताण कमी होणार असून प्रवास अधिक वेगवान आणि थेट होणार आहे. पश्चिम रेल्वेने घेतलेलं हे महत्त्वाचं पाऊल मुंबईच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पायरी ठरेल