फरार आरोपीला शोधायला गेले पोलिसांचे पथक अन हाती लागला नशेच्या गोळ्यांचा साठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सिटीचौक पोलिसांचे पथक फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी आरोपीच्या घरी धडकले. परंतु तेथे आरोपी तर भेटला नाही. मात्र नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांचा मोठा साठा पोलिसांना आढळून आला. शिवाय सादतनगर येथे आरोपीच्या बहिणीच्या घरी लपविलेला साठाही जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री बेगमपुरा व सिटीचौक पोलिसांनी संयुक्तिकरित्या केली. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख नय्यर शेख नईम, शेख नईम शेख महेबूब, शकिराबाई शेख नईम, शेख नदीम शेख नईम, समीना खान अब्दुल अमीन खान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, ऑक्टोबर 2021 मध्ये एन.डी.पी.एस ऍक्टनुसार आरोपी नदीम शेख विरोधात सिटीचौक पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झालेला होता. तेंव्हा पासून तो फरार होता. मंगळवारी संध्याकाळी नदीम घरी आला असल्याची माहिती सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली होती. त्या माहितीवरून एक पथक असेंफिया कॉलोनी भागात रवाना करण्यात आला. पथक नदीमच्या घरी पोहोचल त्यांनी घराची झडती घेतली आता नदीम मिळून आला नाही.मात्र झडतीमध्ये नदीमच्या घरात गुंगी आणणाऱ्या नायट्रोजन-१० या कंपनीच्या तब्बल ४४६ औषधी गोळ्यांचा साठा पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी नदीम चा भाऊ नय्यर यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अजून गोळ्यांचा साठा रेल्वेस्थानक परिसरातील सदातनागर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरात लपून ठेवल्याची माहिती दिली. नय्यरच्या माहितीवरून बेगमपुरा व सिटीचौक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सादतनगर गाठत तेथे छापा टाकला व नय्यरची बहीण समिनाच्या घरातून अल्परासेफ नावाच्या १५० औषधी गोळ्यांचा साठा जप्त केला. या प्रकरणी पाच जना विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात एन.डी. पि.एस.ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment