35,000 महिलांशी संबंध असलेल्या ‘या’ राष्ट्राध्यक्षाने चार दशक देशावर केले राज्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिडेल कॅस्ट्रोने त्यांच्या देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. ते कॅरिबियन समुद्रात स्थित असलेल्या क्यूबाचे पंतप्रधान होते, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष होते. वयाच्या 82 व्या वर्षापर्यंत त्याचे 35,000 महिलांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर बनविलेल्या एका माहितीपटात याचा उल्लेख केला गेला आहे. दररोज सुमारे दोन महिलांशी त्याचे संबंध असायचे असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले होते. हे चार दशकांहून अधिक काळ चालू होते. 1959 मध्ये, क्रांतीच्या माध्यमातून फिडेल कॅस्ट्रो अमेरिकन सरकारची कळसूत्री असलेल्या फुलजेनसिओ बटिस्टा यांच्या हुकूमशाहीची सत्ता उलथून टाकून सत्तेत आले.

फिडेल कॅस्ट्रो यांना कम्युनिस्ट क्युबाचे जनक मानले जात असे. ब्रिटनची राणी आणि थायलंडचा राजा यांच्यानंतर फिडेल कॅस्ट्रो हे जगातील तिसरे असे राष्ट्रप्रमुख होते, ज्यांनी आपल्या देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. 1959 ते 1976 पर्यंत ते क्युबाचे पंतप्रधान होते. यानंतर ते 1976 ते 2008 या काळात देशाचे राष्ट्रपती होते.

फिडेल कॅस्ट्रो यांचे वयाच्या 90 व्या वर्षी 25 नोव्हेंबर 2016 रोजी निधन झाले. त्याचे नावही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. भाषण देऊन त्यांनी हा विक्रम केला. 29 सप्टेंबर 1960 रोजी त्यांनी संयुक्त राष्ट्रात 4 तास 29 मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केले. 1986 मध्ये क्युबामध्ये त्यांचे 7 तास 10 मिनिटांचे सर्वात प्रदीर्घ भाषण नोंदवले गेले.

हवानामधील कम्युनिस्ट पार्टी कॉंग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी असे प्रदीर्घ भाषण केले. त्याच्या गायीच्या नावावरही एक विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. जास्तीत जास्त दूध देण्याची नोंद त्याच्या गायीच्या नावावर आहे. एका दिवसात 110 लिटर दूध देण्याचा विक्रम या गायीने केला होता. त्यांची गाय उब्रे ब्लान्सा म्हणून ओळखली जात होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment