हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे (Pune) शहरात गुन्हेगारीची पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारात खडकी परिसरातही घटना घडली आहे. अनिल साहू (Anil Sahu) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा हादरलं आहे. तसेच, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गोळ्या झाडण्यात आलेले अनिल साहू घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. रविवारी मध्यरात्रीच्या वेळी साहू यांचे कुटुंब गाढ झोप येत असतानाच एक अज्ञात व्यक्ती साहू यांच्या घरात शिरला. यानंतर त्याने अनिल साहूवर एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. हा प्रकार घडत्या वेळी कुटुंबातील सर्व व्यक्ती घरातच होते. त्यामुळे ते उठण्याची भनक लागतात अज्ञात व्यक्तीने घरातून काढता पाय घेतला. पुढे कुटुंबाने अनिल साहू यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दुर्दैवाने हल्लेखोरांने झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहू यांचा मृत्यू झाला.
या सर्व घटनेनंतर साहू कुटुंबाने खडक पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली आहे.. या तक्रारीच्या आधारावर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच , अनिल यांचे पूर्वी कुणाशी वैर होते का? त्यांचे वाद झाले होते का याची चौकशी करत आहेत. दरम्यान, पुण्यासारख्या शहरात दररोज गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचार, खून, चोऱ्या दरोडे अशा अनेक घटना सतत घडत आहेत. यामुळे पुणेकरांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.