मॅफोड्रोनड्रग्स विकणारा तस्कर गजाआड; आयुक्तांच्या विशेष पथकाची कर्णपुऱ्यात कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | व्हाईट मॅजिक नावाने ओळखला जाणारा प्रतिबंधित मॅफोड्रोन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून कर्णपुरा मैदानातून गजाआड केले आहे.त्याच्या ताब्यातून अमली पदार्थासाहित सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली.

जुनेद खान जावेद खान असे अटक करण्यात आलेल्या विक्रेत्यांचे नाव आहे. अमली पदार्थाची तस्करी करून ते नागरिकांना विकणारा एक तस्कर कर्णपुरा मैदानात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयुक्तांच्या विशेष पथकाने कर्णपुरा भागात सापळा रचून रंगेहात आरोपीच्या मुसक्या आवळल्या त्याच्या ताब्यातून 6.73 ग्राम मॅफोड्रोन नावाचा अमली पदार्थ मोबाईल असा सुमारे 1 लाख16 हजार 45 रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई साह्ययक निरीक्षक राहुल रोडे, हवलंदार सय्यद शकील, इम्रान पठाण, एम.बी.विखनकार, आदींच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा प्रतिबंधित अमली पदार्थ कोठून आणला आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Comment