Wednesday, February 8, 2023

PM Kisan : खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये, आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते पहा

- Advertisement -

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान किसानचा पुढचा हप्ता म्हणजे नववा हप्ता (PM Kisan 9th Installment) ऑगस्टमध्ये येईल. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हप्ते पाठविले आहेत. देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

तुम्हाला पैसे मिळतील की नाही याची तपासणी करा
जर आपण पंतप्रधान किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल तर आपले नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
याप्रमाणे लिस्टमध्ये आपले नाव तपासा
1. सर्वप्रथम आपल्याला पंतप्रधान किसान योजना https://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेब साईटला भेट द्यावी लागेल.
2. मेन पेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. Farmers Corner विभागात तुम्हाला Beneficiaries List पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट मधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर Beneficiaries List दिसून येईल, ज्यामध्ये आपण आपले नाव तपासू शकता.

- Advertisement -

आपल्या हफ्त्याचे स्‍टेटस तपासा
वेबसाइटवर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या Farmers Corner वर क्लिक करा. या नंतर बेनेफिशियरी स्‍टेटस (Beneficiary Status) पर्याय वर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. आता आपला आधार क्रमांक, मोबाइल नंबर एंटर करा. यानंतर आपल्याला आपल्या स्‍टेटस बद्दल पूर्ण माहिती मिळेल.

आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी घरून नोंदणी करू शकता. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते नंबर असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर http://pmkisan.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group