कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यूथ क्लब ऑफ कराड एक पाऊल माणुसकीचे हा नविन क्लब तरूणांनी केलेला आहे. या क्लबने हेल्पलाईन नंबर चालू केलेला असून त्याच बरोबर, गोरगरीब कुटूंबीयाना देखील या उपक्रमाच्या मध्यमातून लहान मुलांच्या बिस्किटापासून ते घरच्या किचन पर्यंतचे संपूर्ण साहित्य आपण ओगलेवाडी, हजारमाची व कराड शहरामध्ये कुटूंबीयाना किटबॅग दिलेल्या आहेत.
यूथ क्लब ऑफ कराड या क्लबच्या मेंबर्सनी त्यांच्या पॉकेटमनी मधून एक छोटसा प्रयत्न सुरु केलेला आहे. कोरोनाच्या भयंकर संकटामध्ये समाज व्यवस्था बेधरलेल्या लोकांना संचार बंदीचे कठोर निर्बंध घातलेले आहेत. या परिस्थितीमध्ये तालुक्यातील युवा शक्तीने यूथ क्लब ऑफ कराड एक पाउल माणुसकीचे या उपक्रमच्या मध्यमातून कोरोना काळामध्ये लोकांची धावपळ आणि तारांबळ होऊ नये म्हणून काम करत आहेत.
या उपक्रमासांठी अभिषेक सातपुते, आशिष विभुते, अनिरुद्ध पाटील, हर्षल पाटील, सारंग मुंडेकर, निशांत पवार, नीलम जाधव, ओमकार बोराटे हे परिश्रम घेत आहेत. कोरोना काळात तरूणांनी लोकांसाठी उचललेल्या पाऊलाचे काैतुक होत आहे.