परळीत बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्याला चोरटयांनी लुटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळीमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये काही चोरटयांनी बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या एका विद्यार्थ्याला लुटले (student robbed by thieves) आहे. त्यामुळे परळीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून परळीत इंटर्नशिपची परीक्षा देण्याकरीता आलेल्या विद्यार्थ्याला चोरटयांनी लुटले (student robbed by thieves) आहे.

गणेश घानोकार असे विद्यार्थ्याचं नाव असून तो परळीत एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात इंटर्नशिपची परीक्षा देण्याकरीता आला होता. रात्री अंधार असल्यानं त्याने पहाटे चार वाजेपर्यंत रेल्वे स्थानकावर वेळ घालवला. त्यानंतर राहत असलेल्या लॉजकडे जात असताना रस्त्यातच त्याला चोरट्यांनी अडवून त्याला लुटले (student robbed by thieves). याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1537435046160007168

एटीएममधून जबरदस्तीने पैसे काढून घेतले
यावेळी चोरटयांनी विद्यार्थ्याजवळ असलेले सातशे रुपये आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चोरटे त्याला जवळील एटीएममध्ये जबरदस्तीने घेऊन गेले आणि अकाऊंटमध्ये असलेली सर्व रक्कमही काढून (student robbed by thieves) घेतली. दरम्यान हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा :
धक्कादायक ! आश्रममध्ये काम करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, काय घडले नेमके?

EPFO : नॉमिनेशन नसेल तर क्लेम दाखल करण्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या

IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

Axis-ICICI बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती

Leave a Comment