हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्रीच्या वेळी अहमदाबाद बडोदा एक्स्प्रेस वेवर एका खाजगी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. ही खाजगी बस पुण्याच्या (Pune) दिशेने निघाली होती. परंतु प्रवासादरम्यान बसची सिमेंट टँकरला धडक झाली. या अपघातानंतर बस एक्स्प्रेस वेवरील रेलिंग तोडून थेट 25 फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम वाचा…
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ही खाजगी बस अहमदाबाद येथून पुण्याच्या दिशेने येत होती. त्यावेळी या बसमध्ये 23 प्रवासी प्रवास करत होते. परंतु मध्यरात्री बस अहमदाबाद- वडोदरा एक्स्प्रेस वेवरवर आली असता एक सिमेंट टँकर अचानक डाव्या बाजूला वळल्यामुळे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात बसची सिमेंट टँकरला जोरदार धडक झाली. यानंतर बस थेट रेलिंग तोडून तब्बल 25 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले तर दोन जणांना जागीच आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, या गटाची माहिती मिळतात तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक सेवा देखील खुळमली होती. जिला पोलिसांनी येऊन पुन्हा सुरळीत केले. त्यानंतर पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तर जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. आता या अपघातामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.