हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आफ्रिका देशातील माली येथे एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तब्बल 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर ही बस थेट नदीवरील पुलावरून खाली पडल्यामुळे यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
अपघात कसा घडला? (Bus Accident)
मंगळवारी अपघातग्रस्त बस बुर्किना फासोच्या दिशेने जात होती. याचवेळी सकाळी 5 वाजता दक्षिण-पूर्व भागात असलेल्या नदीच्या पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीचा पूल तोडून खाली कोसळली. या भीषण अपघातात (Bus Accident) 30 पेक्षा अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर बचाव पथकाच्या मदतीने सर्वांना बसमधून बाहेर काढण्यात आले.
जसे जसे पोलीस बसमधून प्रवाशांना बाहेर काढत होते, तस-तसा मृतांचा आकडा वाढत होता. त्यामुळे हा अपघात किती प्रमाणात भीषण होता याचा सर्वांनाच अंदाज आला. दरम्यान, माली येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच माली येथे झालेल्या एका भीषण अपघातात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा याच भागात बसचा अपघात (Bus Accident) झाला आहे. या बसमध्ये पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणातील नागरिक प्रवास करत होते.