व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी 
पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. महामार्गावर उंब्रज जवळ ऊस हा प्रकार अपघात घडला. यामुळे पूर्ण महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जयवंत शुगर कारखान्याला ऊस नेणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास तासवडे टोलनाका ते उंब्रज दरम्यान ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. परंतु ऊस सर्वत्र रस्त्यावर पसरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात ट्रक्टरच्या पुढील भागाचे तसेच ट्राॅलीचे मोठे नुकसान झाले आहे.

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ऊस बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच वाहतूकही व्यवस्थित करण्याचे काम केले. या अपघातानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाजूला केले. तसेच ऊस बाजूला करण्यासाठी ऊसतोड मंजूरांना बोलावून हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.