पुणे जंक्शनवरील रेल्वे डब्याला आग लागण्याची मोठी दुर्घटना; प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे रेल्वे जंक्शनमधील (Pune Railway Junction) अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात अचानक आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. ही आग लागल्यानंतर ताबडतोब अग्निकशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे पुणे जंक्शनवर गोंधळ उडाला होता. मात्र अद्याप ही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. याचा तपास पोलीस घेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे रेल्वे स्टेशनच्या क्वीन्स गार्डनच्या पाठीमागे क्रमांक चार रेल्वे मार्ग येथे रेल्वेचे तीन डबे उभे होते. यातीलच एका डब्याला मध्यरात्री आग लागली. आग लागल्याची माहिती विद्युत विभागाला देतात जंक्शनवरील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. यानंतर अग्निशामक जवानांनी पाण्याचा मारा करत ही आग विझवली. तसेच अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या डब्यामध्ये कोणते प्रवासी नाहीत ना याची खात्री केली.

संपूर्ण एक तासभर अग्निशामक दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. पुढेही आग भिजल्यानंतर इतर दोन डब्यांना देखील सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात आले. मात्र या संपूर्ण घटनेमध्ये ही या कशी लागली हे कोणालाही समजलेले नाही. त्याच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही एका डब्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे पुणे जंक्शन वर प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तसेच, अधिकाऱ्यांचीही धावपळ झाली.