सांगली | सध्या राज्यात सर्वत्र 31 डिसेंबरची धामधुम पहायला मिळत आहे. राज्य सरकारने यंदाचे नववर्ष स्वागतही घरातच साजरे करण्याचे आवाहन करत निर्बंध कडक केले आहेत. मात्र पार्टी करणार्यांचे जिरदार नियोजन सुरुच असल्याचं चित्र आहे. गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणली जाणारी दारु पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे. तब्बल 57 लाखांची दारु वाहतुक करणारा ट्रक महिला अधिकार्याने पकडला आहे. यावेळी रात्रीच्य अंधारात मैदाच्या पोत्यांआड दारुची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गोवा राज्यातून बेकायदेशीररीत्या महाराष्ट्रात आणली जाणारी दारू उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून पकडली. मिरज पंढरपूर मार्गावर सदरची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कंटेनरसह 57 लाखांची दारू यावेळी जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.
कंटेनर मधून मैदा पोत्या आड लपून दारू आणली होती. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सदरची मोठी कारवाई करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले. येणार्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तस्करांवर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांना माहिती मिळाली कि, गोवा राज्यातून गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा बेळगाव मार्गे महाराष्ट्रात आणला जात आहे. या माहितीच्या आधारे सांगली जिल्ह्यात मिरज – पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावण्यात आला.
यावेळी वाहनांची तपासणी करत असताना भारत बेंझ कंपनीच्या 12 चाकी माल वाहतूक करणार्या कंटेनर मध्ये गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला देशी-विदेशी मद्य, बिअरच्या बाटल्याचा मोठा साठा आढळला. सदरचा दारूसाठा हा मैदा पोत्यांच्या आड लपवून आणण्यात येत होता.
परप्रांतीय ट्रकच्या आधारे राज्यात बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी केली जात होती. या कारवाई मध्ये गोवा बनावटीच्या रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिली 1 हजार 220 बाटल्या, ट्युबर्ग कंपनीच्या बिअरच्या 500 मिली क्षमतेच्या 4 हजार 800 बाटल्या, किंगफिशर स्ट्राँग 500 मिलीच्या 2 हजार 400 बाटल्या असा एकूण 56 लाख 74 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.