कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तालुक्यातील उंब्रज येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या आवारात बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कडकडाट करत वीज पडली. या विजेमुळे जमिनीत सुमारे दोन फूट खोल खड्डा पडला. या प्रकारानंतर घटनास्थळी पडलेला खड्डा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, बुधवारी उंब्रज व परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची आवारात मोठा कडकडाट करत वीज पडली. यावेळी वीज पडल्याचे दिसताच बाजार समिती परिसरात उभ्या असलेल्या लोकांचे लक्ष गेले. तेव्हा वीज पडल्यानंतर धूर मोठ्या प्रमाणात दिसू लागला होता.
वीज पडल्याने जमिनीत मोठा खड्डा निर्माण झाला. दरम्यान, या खड्यात ही अंतर्गत दोन होल पडले असून ते होल खोलवर असून किती फूट आत गेले आहेत हे समजू शकलेले नाही. सुमारे दोन तासानंतर संबंधित खड्यातुन धूर येत होता. तसेच खड्यातील माती कोळस्या सारखी काळी पडली होती. या घटनेनंतर सर्वत्र या घटनेची चर्चा होऊन ही घटना पाहण्यासाठी लोक घटनास्थळी येत होते.