हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या काळामध्ये आपण दुकान असो किंवा घर व्यवस्थित बंद केल्याशिवाय त्याला कुलूप लावल्याशिवाय बाहेर पडत नाही. चोरांच्या भीतीने तर आपण घराला एका मिनिटासाठी देखील मोकळे सोडत नाही. परंतु महाराष्ट्रात असे एक गाव आहे ज्या ठिकाणी कुलूप सोडा घरांना दरवाजेच नाहीत. असे असताना देखील या गावात आजवर चोरीच्या घटना घडलेल्या नाहीत. हे गाव नेमके कोणते आहे? चला जाणून घेऊयात….
शनि देवाचे गाव
महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या गावाचे नाव शनिशिंगणापूर आहे. या गावांमध्ये शनि देवाचे खूप मोठे आणि प्रसिद्ध मंदिर देखील आहे. शनीचे दर्शन घेण्यासाठी गावांमध्ये खूप लांबून भाविक येत असतात. गावाच्या मंदिरामध्ये शनि देवाचे 5 फूट उंचीची मोठी मूर्ती आहे. असे म्हणतात की शिंगणापूर गावाचे रक्षक शनिदेवच आहेत.. शनिदेव माणसाच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींची नोंद ठेवतात आणि त्यांना शिक्षा देखील देतात. त्यामुळे या गावातील लोकांची अशी श्रद्धा आहे की शनिदेव आपले आणि आपल्या गावाचे रक्षण करतात.
शिंगणापूर गावच्या लोकांची मान्यता आहे की, गावावर शनि देवाची कृपा आहे. या गावच्या वेशीवर शनिदेव आहे जो प्रत्येक घराचे रक्षण करतो. त्यामुळेच येथील सर्व घरे दरवाजा नसलेली आहेत. आपण या गावातील कोणतेही दुकान किंवा घरे पाहिली तर, हे लक्षात येईल की कोणत्याही घराला दुकानाला दरवाजे नाहीत. ज्या दुकानांना दरवाजे आहेत त्या दरवाजांना कुलूप नाही. इतकेच नव्हे तर गावात असणाऱ्या बँकेच्या दरवाजाला देखील कुलूप बसवण्यात आलेले नाही.
गावात चोरी होत नाही
विशेष बाब म्हणजे या गावातील घरांना दरवाजे नसले तरी आजवर या ठिकाणी चोरी झालेली नाही. गावकरी असे देखील सांगतात की ज्या लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांचा कोणत्या ना कोणत्या कारणावरून मृत्यू देखील झाला. म्हणजे ते शनि देवाच्या क्रोधापासून वाचू शकले नाहीत. इथल्या गावकऱ्यांची शनिदेवावर प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळेच शनिदेव आपल्या घराचे रक्षण करेल अशी श्रद्धा ठेवून गावकरी घराला दरवाजे बसवत नाहीत.