बहिणीला भेटून येत असताना दुचाकीचा अपघात, लहान भावाचा जागीच मृत्यू

a wild boar hit the bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये रानडुकराने दिलेल्या धडकेत (a wild boar hit the bike) लहान भावाचा मुत्यू झाला आहे तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेजण आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात (a wild boar hit the bike) झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी शिवारीतल पॉवर हाऊस जवळ रात्रीच्यावेळी हि घटना घडली.

रानडुक्काराने दिली धडक
हे दोघे भाऊ आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतत असताना रानडुक्काराने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक (a wild boar hit the bike) दिली. यामुळे दुचाकी खाली पडून या दोघांचे डोके दगडावर आदळले. यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. प्रदीप गोपीचंद नागपुरे असे मृत लहान भावाचे नाव आहे तर दिलीप गोपीचंद नागपुरे मोठ्या भावाचे नाव आहे.

खापा मोहाडी येथून दोघे भाऊ दुचाकीने आष्टी येथे बहीणीला भेटण्यास गेले होते. सायंकाळी दोघेही आष्टीवरून नाकाडोंगरी ते कवलेवाडा मार्गे जात असताना पाथरी पॉवर हाऊसजवळ त्यांच्या दुचाकीला रस्त्याच्या कडेने धावत आलेल्या रानडुक्कराने दुचाकीला जबर धडक (a wild boar hit the bike) दिली. यानंतर हे दोघे भाऊ खाली कोसळले(a wild boar hit the bike) . यामध्ये दगडावर डोके आपटून प्रदीप गोपीचंद नागपुरे याचा जागीच मृत्यू झाला तर दिलीप गोपीचंद नागपुरे गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी भावाला उपचारांसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. आपला तरुण पोरगा गमावल्यामुळे नागपुरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर