व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : कराड- तासगाव मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशात कराड- तासगाव मार्गावर वडगाव हवेली येथे डिझेल संपलेल्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड – तासगाव मार्गावर वडगाव हवेली इथे महात्मा गांधी विद्यालयासमोर डिझेल संपल्यामुळे उभ्या असलेला ट्रॅक्टर ट्रेलरला (MH 11 BA – 1194 ) ला पाठीमागून स्प्लेंडर दुचाकीची (MH-50-3764) ने धडक दिली.

दुचाकी व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या या अपघातात दुचाकी चालक रोहिदास उर्फ किरण माणिक गोडसे (वय 31, रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली) हा युवक जागीच ठार झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला सदानंद आप्पासो शिंगाडे (वय 25, रा. शेरे, ता. कराड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.